जयसिंगपूर शहरात १८१ कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क जयसिंगपूर शहरात भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. याची दखल घेऊन जयसिंगपूर नगरपरिषदेकडून ॲनिमल बर्थ कंट्रोल आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम जोमात राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आजअखेर १९५ भटकी कुत्री पकडण्यात आली असून, त्यापैकी १८१ कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ही मोहीम जयसिंगपूर नगरपरिषद आणि ‘आसरा ॲनिमल वेल्फेअर ऑर्गनायझेशन’, बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात असून, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू आहे. शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी नगरपरिषद प्रशासनाने ही मोहीम दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू केली आहे. भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. लहान बालकं, शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांच्यावर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी टीना गवळी यांनी तातडीने पावले उचलत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिमेला गती दिली....