हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड येथील पाचवा मैल - बोरगाव मार्गावर नेर्ले मळ्याच्या पुढे असणार्‍या रस्त्याकडेला महिला तसेच पुरुषाचे संशयितरित्या वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सकाळ पासून या ठिकाणी लेडीज चप्पल, पुरुषांचे दोन पॅन्ट, बरमोडा, पांढरे हॅडग्लोज, पायमोजे तसेच चाव्यांचा बंच व अभिषेक रमेश माने या नावाचे पॅन कार्ड आढळून आले असून दुपारच्या सुमारास गावातील काही वाहनधारकांनी या ठिकाणी रक्ताचे बोळे पाहिल्याचे सांगितल्याने मोठा संशय व्यक्त होत असून घटनास्थळाची पाहणी कुरुंदवाड पोलिसांनी केली आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळच्या सुमारास काही नागरिकांनी सदरच्या वस्तू पाहिल्या होत्या. यानंतर दुपारच्या सुमारास दोन शेतकऱ्यांना या ठिकाणी रक्ताचे बोळे तसेच चिप्स पॅकेट सह विविध वस्तू पाहिले होते. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केली. 

याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, संशीतरित्या वस्तू आढळून आल्याने परिसरातील शेती परिसरात पोलिसांनी पाहणी केली असता काहीही मिळून आले नाही, दरम्यान संशयित वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष