बोरगाव नगरपंचायतीसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पाचव्या दिवशी तिन्ही गटाकडून एकूण 12 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी निरंजन हिरेमठ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
गेल्या 8 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रवेश प्रक्रिया चालू असताना देखील तिन्ही ही गटाकडून आज सोमवार दी 13 रोजी पाचव्या दिवशी या ठिकाणी 12 उमेदवारी अर्ज भरण्यात आलेली आहेत.
यामध्ये युवा नेते उत्तम पाटील गटाकडून व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हवले गटाकडून अपक्ष म्हणून 08 इतक्या लोकांनी उमेदवारी दाखल केली आहे तर आमदार खासदार प्रेमी गटाकडून एकूण 4 इतक्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे. सध्या एकूण 12 उमेदवारी अर्जा पैकी 3 उमेदवार महिला व 9 पुरुष म्हणून उमेदवारी भरण्यात आलेली आहे.
वार्ड क्रमांक 1 मधून दोन अर्ज दाखल झाले असून एक भाजप तर दुसरा अपक्ष आहे, वार्ड 3 मधून एक अर्ज अपक्ष आहे,वार्ड 6 मधून एक अर्ज भाजप तर वार्ड 7 मधून एक अर्ज अपक्ष आहे. वॉर्ड 9 मधून एक बीजेपी, वार्ड 10 मधून एका अपक्ष, वार्ड 11 मधून दोन अपक्ष,वार्ड 13 मधून एक अपक्ष, वार्ड 14 मधून एका पक्ष वार्ड 16 मधून 1अपक्ष,असे संबंधित प्रभगमधून उमेदवारी अर्ज मुहूर्ताच्या वेळेत तिन्ही गटाकडून भरण्यात आले आहेत. अध्याप निवडणुकीच्या अर्ज भरनेसाठी दोन दिवसांचा अवधी बाकी असल्याने येणाऱ्या दोन दिवसांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे.
बोरगाव नगर पंचायतीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून निरंजन हिरेमठ, टी टी नाडकर्णी, जी डी मंकाळे, लक्ष्मण ए को,एन आर रायकर,यांच्या शिवाय रूपल कांबळे म्हणून काम पाहात आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा