बोरगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात
42 जणांची माघार ...निवडणूक होणार तिरंगी
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
27 डिसेंबरला होणाऱ्या बोरगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अखेर 92 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता .आज उमेदवारी माघार शेवटच्या दिवशी 42 जणांनी माघार घेतल्याने एकूण 17 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात उभे असल्याचे माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
17 प्रभांगासाठी उत्तम पाटील गटाच्या नगर विकास पॅनल मधून 17 उमेदवार , तर माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हवले गटाच्या परिवर्तन पॅनेल मधून 17 उमेदवार तसेच भाजप गटातून 16 उमेदवार रिंगणात उभे आहेत. शनिवारी अर्ज माघारी चा शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी रात्री काही घडामोडी होतील व निवडणुकीत दुरंगी होईल असा अंदाज होता. मात्र तिन्ही गटाकडून निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने निवडणूक तिरंगी होणार आहे .यासाठी तिन्हीही गटाकडून प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे होणारी निवडणूक ही सर्वांनाच प्रतिष्ठेची बनली आहे.
आज सर्वच गटाच्या उमेदवारी निश्चित असल्याने अधिकारीही प्रत्येक उमेदवार चिन्ह वाटप केले .यामध्ये भाजपला कमळ, नगर विकास पॅनल ला शिट्टी व परिवर्तन पॅनेलला कपबशी देण्यात आले.
निवडणूक ही तिरंगी होणार असल्याने तिन्ही गटालाही ही निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे आतापासूनच प्रचाराला सुरुवात झालेली आहे. उमेदवार हे आपल्यामधील हेवेदावे विसरून प्रत्येक मतदाराची गाठीभेटी घेताना दिसत आहेत.त्यामुळे मतदारच यांचे भवितव्य ठरवणार हे मात्र नक्की.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा