हेरवाडमध्ये वनविभागाच्या वतीने गव्याची शोधमोहिम

 हेरवाड/ शिवार न्यूज नेटवर्क :

छाया : संग्रहित

हेरवाड येथील इथेनॉल कारखाना परिसर, गलगले मळा तसेच घोसरवाड हद्दीत असणाऱ्या शेतात रात्रीच्या सुमारास काही शेतकऱ्यांना गव्याचे दर्शन झालेहोते. कोल्हापूर नंतर आता हेरवाड मध्ये गव्याचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे होते, याच्या पार्श्वभूमिवर वनविभागाचे अधिकारी संज्योत शिरोळकर यांनी हेरवाडला भेट देवून गवा आलेल्या ठिकाणाची पाहणी करून परिसरातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.

कोल्हापूरसह पेठवडगांव परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून गव्याचे दर्शन झाले होते. दरम्यान कोल्हापूर येथील परिसरात गव्याच्या हल्यात एकजण मृत्यूमुखी तर दोघे जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच हेरवाड येथील श्री संतुबाई मंदिर परिसरात असणार्‍या इथेनॉल कारखान्या लगत काही शेतकर्‍यांना गव्याचे दर्शन झाले होते. तसेच पाचवा मैल मार्गालगत असलेल्या गलगले मळ्यानजीकही काही शेतकऱ्यांना गवा दिसून आले होते. त्यामुळे हेरवाड मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच्या पार्श्वभूमिवर वनविभागाचे अधिकारी संज्योत शिरोळकर यांनी हेरवाडला भेट देवून गवा आलेल्या ठिकाणाची पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला. यावेळी बोलताना शिरोळकर म्हणाले, या परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सावधानता बाळगावी तसेच गवा दिसल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पंचायत समिती सदस्या मिनाज जमादार, ग्राविकास अधिकारी पी.आर. कोळेकर, युनूसू जमादार, अर्जुन जाधव, अमोल कांबळे, देवगोंडा आलासे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव माळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष