गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

 


शिवार न्यूज नेटवर्क : 

राधानगरी येथून एक किलोमीटर अंतरावर सोन्याची शिरोली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेला गव्याने धडक दिली.

अलका लहू चौगले (वय ४५) असे या महिलेचे नाव असून त्यांच्या कमरेला मार बसल्याने उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

चौगले या शेरी नावाच्या शेतात काम करत असताना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. गव्याने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारांसाठी दाखल केले. मात्र कमरेला मार बसल्याने चौगुले यांना पुढील उपचारांसाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. बी. बिराजदार सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

कोल्हापूर येथे झालेल्या हल्ल्यामुळे या परिसरात लोकांनी गव्यांची दहशत घेतली आहे. आसपासच्या सर्व गावच्या शिवारांमध्ये गव्यांचा कळपाने वावर असतो. लोकांनी सावध राहुन काम करण्याचे अवाहन वन विभागाने केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष