राजेश तांबवे राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

 

 राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

     यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख उद्योगपती राजेशजी तांबवे साहेब यांनी गेली 20 वर्ष सामाजिक क्षेत्रात भरघोस काम केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्कार मिळाला आहे.

     तांबवे सर्विसेस च्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार देण्याचे काम साहेबांनी केले आहे.त्याचबरोबर तांबवे इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आर्थिक दुर्बल ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशांना आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये फ्रीमध्ये ॲडमिशन देऊन त्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम तांबवे साहेबांनी केले आहे.

   तसेच 31मे 2021 अहिल्यादेवी होळकर जयंती दिवशी साहेबांनी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये 15 महिलांना फॅशन डिझायनिंग कोर्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स आयटीआय कोर्स मोफत देण्याची घोषणा केली आणि तात्काळ त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये साहेबांनी केले आहे.

     वेळोवेळी अनेक आर्थिक दुर्बल समाजातील लोकांना आर्थिक ही मदत केली आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाला मदत करण्यात आली आहे, समाजाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे मुख्य प्रवाहात समाज यावा यासाठी तांबवे साहेब नेहमीच प्रयत्न करत असतात.  आजपर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक याच्या वतीने राष्ट्रीय यशवंतरत्न पुरस्कार होळकर घराण्याचे थेट तेरावे वंशज मा श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.  सूत्रसंचालन सचिव योगेश हराळे यांनी केले व आभार जिल्हा संघटक तमा शिरोळे यांनी मांडले.

यावेळी उपस्थित यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ संदीप हजारे, संजय गांधी निराधार योजना सदस्य डॉ विजयकुमार गोरड, जिल्हाप्रमुख संजय काळे, सतीश मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष अमर पुजारी, सचिव योगेश हराळे, जिल्हा संघटक तमा शिरोळे, कागल तालुका अध्यक्ष उत्तम पाचगावे, करवीर उपाध्यक्ष संदीप वळकुंजे, मौजे वडगाव चे तंटामुक्ती अध्यक्ष महेश कांबरे, संघटक शाहीर संदीप वळकुंजे, सुनील थोरात, उचगाव शाखा अध्यक्ष भीमराव वळकूंजे, कागल शहर उपाध्यक्ष अजिंक्य शेळके, इत्यादी मान्यवर व यशवंत सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष