तेरवाड ग्रामपंचायतीसमोर संतप्त महिलांचे ठिय्या आंदोलन

 


तेरवाड/ शिवार न्यूज नेटवर्क :

      तेरवाड ता शिरोळ येथील गंगापूर या उपनगरात सय्यद ट्रंक मार्ट यांच्या ध्वनी प्रदूषणामुळे ग्रामस्थांना त्रास होत असल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे करूनही ग्रामसेवक दुर्लक्ष करत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने व गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा ध्वनी प्रदूषण होत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता. 

         दरम्यान गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पत्रा बनवण्याचे ध्वनिप्रदूषणाचे काम सुरू असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा घेऊन गेला असता मोर्चा येत असल्याचे पाहून ग्रामसेवक रेळेकर यांनी मिटिंगचे कारण सांगून पळ काढल्याचा आरोप संतप्त महिलांनी करत ग्रामसेवक दलित समाजावर अन्याय करत असून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी कारखानदार सय्यद यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मारला व दोन दिवसात पुन्हा उग्र आंदोलन करणार असल्याचे महिलांनी सांगितले. 

      तेरवाड गंगापूर येथे मध्यवस्तीच्या ठिकाणी मातंग समाज वस्तीत सय्यद ट्रॅक मार्ट हे पत्र्याच्या पेट्या तयार करण्याचा कारखाना आहे. पेट्या तयार करण्यासाठी पत्र्याला आकार देण्यासाठी पत्रा बडवावा लागतो याचे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते.दिवसभर पत्रा बडवण्याचे काम सुरू असते.यामुळे परिसरातील विद्यार्थी व सर्वसामान्य ग्रामस्थांना या पत्र्याच्या बडवण्याच्या आवाजाचा त्रास होत असल्याने

परिसरातील ग्रामस्थांनी हा कारखाना बंद करून ध्वनी प्रदूषण थांबवावे यासाठी शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले होते.

        याबाबत ग्रामसेवक रेळेकर यांच्याकडे अहवाल मागितला होता.मात्र ग्रामसेवक रेळेकर यांनी अहवाल सादर केलेला नाही.हा विषय ग्रामपंचायत सदस्यांचा असल्याचे सांगत ग्रामसेवक रेळेकर यांनी आपल्यावरील जबाबदारी झटकून लावत आज पर्यंत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसेवकाची चौकशी होऊन कारखानदारांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा दोन दिवसात उग्र आंदोलन करणार असल्याचे महिलांनी सांगितले.याबाबत ग्रामसेवक रेळेकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

     यावेळी मोर्चात सुशीला सातपुते, अनुसया शेडबाळे, संपदा शेडबाळे, शांताबाई शेडबाळे,दीपा शेडबाळे, चंपाबाई शेडबाळे, इंदूबाई हेगडे, वंदना हेगडे, सरिता शेडबाळे, उषा सनदी सह आदी महिला उपस्थित होत्या.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष