बंगळुरू घटनेच्या निषेधार्थ उदगांव बंद ...!
राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी उदगावतील शिवप्रेमीनी व्यक्त केली. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी उदगाव (ता. शिरोळ) येथे समस्त ग्रामस्थांकडून गाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला गावातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू घाटगे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे.कन्नडिंगाना आलेली मस्ती शिवप्रेमी नक्कीच उतरवतील.हे प्रकरण अत्यंत घृणास्पद असून आरोपींवर अत्यंत कडक कारवाई करावी. संतप्त शिवप्रेमींनी कर्नाटकचा ध्वज जाळून निषेध व्यक्त केला. 'जय भवानी जय शिवाजी' या जयघोषात गावातून रॅली काढण्यात आली.
यावेळी अशोक वरेकर, दिलीप माने, मंगेश घाटगे, शरद लुगडे, शिवाजी गायकवाड,विनायक पाटोळे, मयप्पा लांडगे, प्रतीक पाटील, पिंटू हेरवाडे, विक्रम घाटगे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा