दत्तवाड येथील खोकी धारक गाळ्यांच्या प्रतीक्षेत



इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

दत्तवाड (तालुका शिरोळ) येथील जुन्या ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये बांधण्यात आलेल्या गाळ्यांच्या प्रतीक्षेत दत्तवाड येथील खोकी धारक असल्याचे दिसून येत आहे.

दत्तवाड येथील जुन्या ग्रामपंचायतीसमोर अंदाजे ९ लाख ३० हजार रुपये खर्च करून ही गाळे बांधण्यात आले आहेत. या गाळ्यांचा उद्घाटन भवानीसिंह घोरपडे (सरकार), बाळासो शिंदे, बबन चौगुले, दिलीप चव्हाण, बादशाह मुल्ला, राजगोंडा पाटील, माजी सरपंच संगिता झुणके, जरीनाबी मुल्ला, कांचना चौगुले आदी मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्घाटन झाल्यापासून आज अखेर ही गाळे जसेच्या तसे बंद स्थितीतच आहेत.

दत्तवाड या ठिकाणी असणारा मुख्य रस्ता रुंदीकरण करण्यासाठी या रस्त्यावर असणारे खोकी धारकांना ग्रामपंचायत प्रशासनाने तुम्हाला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जुन्या ग्रामपंचायत समोर बांधण्यात येणाऱ्या गाळ्यांमध्ये पर्यायी जागा देण्यात येईल असे आश्वासन देऊन याठिकाणी असणाऱ्या खोके धारकांना हटवले. पण गेली दीड वर्षे झाले जुन्या ग्रामपंचायत समोर बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा उद्घाटन होऊन सुद्धा या खोके धारकांना या ठिकाणी गाळे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या खोकी धारकांवर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे या खोकी धारकांनी लेखी तक्रार देऊन सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे खोकी धारकाकडून बोलले जात आहे. आश्वासन देऊन सुद्धा आम्हाला खोकी मिळत नसल्यामुळे यामागे नेमके गौडबंगाल काय आहे? असा प्रश्न या खोकी धारकांना मध्ये निर्माण झाला आहे. तरी आमच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून या बांधण्यात आलेल्या नूतन गाळ्यांमध्ये आम्हाला गाळे उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी खोकी धारक करत आहेत.

तर उपोषणाचा मार्ग

 जर दिलेल्या आश्वासनाचे पूर्तता ग्रामपंचायत प्रशासनाकडून नाही झाली. तर ग्रामपंचायत समोर आंदोलन, उपोषण सारखे मार्ग अवलंबण्यात येतील असा इशारा खोकी धारक इकबाल नदाफ, सचिन नेजे, बंडा परीट, आसिफ नदाफ यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष