भीमा नदीच्या मोजमापास केंद्रीय जल आयोगाच्या वतीने सुरुवात

 

   राहुल डोंगरे/शिवार न्यूज नेटवर्क: 


   केंद्रीय जल आयोगाच्या पुणे विभागामार्फत भीमा नदीच्या मोजमापस सुरवात करण्यासाठी पुण्याहुन तज्ञ अधिकारी व कर्मचारी यांचे पथक रवाना उप मंडल अभियंता सौ.एम. सत्या यांच्या नेतृत्वाखाली मोजण्यास सुरुवात .

       गेली पंधरा वर्ष केंद्रीय जल आयोगाने कृष्णा नदीचे मोजमाप केले आहे प्रथमचं भीमा नदीचे मोजमाप करण्यास सुरवात केली आहे.सदर मोजमाप करण्याच्या पथकाथ कुरुंदवाड केंद्राचे कनिष्ठ अभियंता रुपेश कुमार यादव, कराड केंद्राचे कनिष्ठ अभियंता अजित माने, अर्जुनवाड केंद्राचे कुशल सहायक उद्धव मगदूम, सदलगा केंद्राचे कार्य सहायक प्रकाश कुंभार, कुरुंदवाड केंद्राचे कार्य सहायक एम. बी. कांबळे, समडोळी केंद्राचे कार्य सहाय्यक विलास पवार, पुण्याचे राहुल पाटील, अनिल मोरे, पवन वाघमारे आदी चा समावेश आहे.यावेळी कार्यकारी अभियंता अभिषेक गौरव मिरज विभागाचे उप मंडल अभियंता काकासाहेब मिस्त्री, प्रशांत कांबळे, आदी. उपस्थित होते.सदर मोजमापाने प्रति वर्षी भीमा नदीची खोली व रुंदी वर किती परिणाम होऊ शकतो याचा अहवाल कळू शकतो


   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष