शाईफेकीच्या निषेधार्थ कोल्हापुरात निदर्शने

 महाराष्ट्रात कर्नाटकची एकही बस येऊ न देण्याचा इशारा

कोल्हापूर/ शिवार न्यूज नेटवर्क :


सोमवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महामेळाव्याचे आयोजन केले होते. याचवेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या अज्ञात व्यक्तीने मेळाव्याच्या ठिकाणी येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासण्याचे कृत्य केले. या घटनेच्या निषेधार्थ सर्वचस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्षांवर झालेल्या शाईफेकीच्या संतापजनक घटनेनंतर कोल्हापुरात सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. येथील ऐतिहासिक दसरा चौकात विविध पक्ष संघटनांच्या उपस्थितीत कन्नड रक्षक वेदिकेचा निदर्शने करून निषेध व्यक्त केला. अशाच पद्धतीने मराठी भाषिकांवर अन्याय होत असेल यापुढे एकही कानडी हॉटेल अथवा बस महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, सोमवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महामेळाव्याचे आयोजन केले होते. याचवेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या अज्ञात व्यक्तीने मेळाव्याच्या ठिकाणी येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासण्याचे कृत्य केले. या घटनेच्या निषेधार्थ सर्वचस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. कन्नड रक्षण वेदिकेचाही निषेधही व्यक्त केला जात आहे. या गंभीर घटनेनंतर आता महाराष्ट्र एकीकरण समितीने संपूर्ण सीमाभागात उद्या एक दिवस बंदची हाक दिली आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण मराठी भाषिक सीमावासीयांच्या पाठीशी

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आला आहे. याबाबत वारंवार आंदोलन तसेच निदर्शने केली जात आहेत. तरीही कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून संतापजनक घटना घडत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातसुद्धा याची गंभीर दखल घेतली आहे. अनेक पक्ष संघटनांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी असल्याचे मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी म्हटले आहे. यापुढे सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय झाला तर महाराष्ट्रातील कन्नड लोकांचे व्यवसाय चालू देणार नाही. एव्हढेच नाही तर महाराष्ट्रात एकही बस येऊ देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष