कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : शिरोळकरांची मागणी
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटक राज्यातील बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केलेच्या घटनेचा निषेध करून कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोमई यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी येथील अमरसिंह कांबळे युवा सोशल फाउंडेशन व शिवभक्त यांच्यावतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, शिरोळ येथील तालुका पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सोमवारी दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले, विटंबना घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारचा धिक्कार करीत पुरोगामी कार्यकर्ते व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,,,,,जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषानी परिसर दणाणून सोडला.
तहसीलदार सौ अपर्णा मोरे- धुमाळ व शिरोळ पोलीस ठाण्यास शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले, यावेळी फाउंडेशनचे प्रमुख अमरसिंह कांबळे, पुरोगामी कार्यकर्ते राजेंद्र प्रधान, खंडेराव हेरवाडे ,दगडू माने, विश्वास कांबळे, फिरोज मुजावर, मजीद आतार, उदय शिरोळकर ,प्रदीप पाटील, चिदानंद कांबळे ,अविनाश कांबळे ,मिराजी व्हनकटे, विक्रम कांबळे ,विजय भोसले ,राजेंद्र कांबळे, शिवगोंडा पाटील, बंडा परीट ,सविता पाटील, अमोल होवाळे यांच्यासह युवा शिवभक्त उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, बंगळूरु येथे विटंबना केलेल्या संशयित आरोपींना कडक शासन करावे, कर्नाटक सरकारने मराठी बांधवावर त्रास देणारी कारवाई थांबवावी, विटंबना सारखे प्रकार होऊ नयेत यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, विटंबना घटनेनंतर बेताल वक्तव्य करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई यांनी नैतिक पराभव समजून त्वरित राजीनामा द्यावा, देशात समता व शांतता प्रस्थापित करण्यासाठी शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अभिवादन करीत असून केंद्र सरकारने शिवभक्तांची भावना जाणून घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा