शिवनाकवाडी गावसभेत अन्न पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा निषेध
शिवनाकवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथील वादग्रस्त ठरलेल्या लक्ष्मी सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानांच्या बाजूने अन्न पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी निर्णय देत परवाना कायम ठेवला. यांच्या निषेधार्थ गावसभेत नामदार कदम यांचा निषेधाचा ठराव करीत आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान राज्यातील मंत्र्याचा गावसभेत निषेध करण्याची हि पहिलीच वेळ असल्याची घटना शिवनाकवाडी इथे घडली आहे.
शिवनाकवाडी इथील सरकार मान्य लक्ष्मी स्वस्त धान्य दुकानामध्ये मालकांकडून धान्य वितरीत करण्याबाबत पक्षपातीपणा, अनियमितता, ग्राहकांना अपशब्द बोलणे अदि तक्रारी गामपंचायतीचे आल्या होत्या. याबाबत गामपंचायतीने जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या कडे लेखी तक्रार झाल्या यामध्ये दुकान मालक उमरानी यांच्या विरोधात निकाल देवून परवाना रद्द झाला होता. याला अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी स्थगिती देत दुकान मालक उमरानी याच्या बाजूने निकाल दिला होता. या निर्णयाचे पडसाद शिवनाकवाडी गावसभेत उमटले. या विरोधात पाचशे पेक्षा जास्त गामसथांनी गावसभेत उपस्थित राहून निषेध व्यक्त केला. यावेळी स्वागत खोत, बाळासो खोत, बाळासो पुजारी, शोभा सदलगे यांनी दुकानदाराला पठिशी घालत निर्णय देणारे अन्न पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या निषेधाचा ठराव सर्वानुमते मजूंर करण्यात आला. रेशन दुकानाविरोधात ग्रामस्थांच्या वतीने तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी सरपंच श्रीकांत खोत, उपसरपंच आशा खोत, गामसेवक एन. एच. मुल्ला, भारती आरगे, अश्विनी खोत, वर्षा पुजारी, विजय खोत यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा