अकिवाट वीर सेवा दलाच्या संघनायक पदी आदिनाथ पाटील यांची नियुक्ती

 अमोल सुंके / शिवार न्यूज नेटवर्क :


अकिवाट येथे वीर सेवा दलाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. यात आदिनाथ राजगोंडा पाटील याची संघनायकपदी तर शुभम रावसो पाटील याची उपसंघनायकपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीप्रसंगी वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

वीर सेवा दल मध्यवर्ती समिती असो किंवा दक्षिण भारत जैन सभा असो अकिवाटचं योगदान नहमीच उल्लेखनीय राहिले आहे. आचार्य श्री 108 विद्यासागर महाराजांचे पावन समाधीस्थळ असलेल्या अकिवाट गावाने धार्मिक कार्यांतुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पदाधिकारी नियुक्तीवेळी दत्तवाडचे शाखाधिकारी कुमार चौगुले, तसेच अकिवाट गावातील वीरसेवा दलाचे मध्यवर्ती समिती सदस्य तात्यासो पासोबा, कल्लगोंडा किनिंगे,अशोक म्हैशाळे,शांतीनाथ रायनाडे, बाहुबली मग्गेनावर, सागर घोसरवाडे, जुने दानवाडचे संघनायक सुजित तिप्पनावर, जुने दानवाडचे उपसंघनायक अनुराग पाटील व त्याच बरोबर अकिवाट गावातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

शाखेच्या इतर पदांमध्ये संचालक म्हणून उद्देश पाटील, महावीर शिरगुप्पे, संयम पाटील, इंद्रजित पाटील यांची तर विभाग प्रमुख म्हणून किरण ऐनापूरे, अमोल कागे, महावीर मुधोळे, सम्मेद चौगुले, प्रशांत पाटील, शांतीनाथ रायनाडे, पारस कोथळी यांची निवड करण्यात आली.

स्व.बाबासाहेब कुचनुरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि विशेषत युवकांच्यात धर्माच्या राक्षणाची आणि जपवणुकीची बीजे रोवणे , अश्या प्रकारची उद्दिष्टे घेऊन वीर सेवा दल मध्यवर्ती समिती कार्य करत आली आहे. 'गाव तिथे शाखा आणि घर तिथे सदस्य' या उपक्रमातुन आज प्रत्येक गावात वीर सेवा दलाची शाखा निर्माण झाली आणि आणि प्रत्येक घराघरात वीर-सैनिक घडत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष