हेरवाडमध्ये पाच एकर ऊस जळून खाक

 

संग्रहित

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड- घोसरवाड मार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर हून अधिक क्षेत्र जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये सुमारे दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे. 

हेरवाड - घोसरवाड मार्गालगत माळी बंधूंची शेती आहे. शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने या परिसरातील सुमारे पाच एकर हून अधिक क्षेत्र जळून खाक झाले. सदरची आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज या परिसरातील शेतकऱ्यांनी वर्तवला आहे. या आगीची घटना समजताच या परिसरातील शेतकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. यामध्ये सुमारे दहा ते पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. दरम्यान, महापुरामुळे अगोदरच नुकसानीच्या खाईत असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस आगीत जळून खाक झाल्याने येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांनी ऊस तातडीने नेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची मागणी या परिसरातून होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष