बोरगाव नगर पंचायतीसाठी १०६ पैकी ९२ अर्ज वैध
नगर पंचायतीची निवडणूक तिरंगी होणार : राजकीय घडामोडींना वेग
अजित कांबळे/ शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १५) शेवटच्या दिवशी तिन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शनाने एकूण १०५ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी निरंजन हिरेमठ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले होते. गुरूवारी (ता. 16) झालेल्या छाननीत १०६ पैकी १४ अर्ज अवैध तर ९२ अर्ज वैध ठरले. येथील निवडणूक तिरंगी होणार असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता शनिवार (ता. १८) अखेर अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बोरगाव नगर पंचायतीत निवडणूक अधिकारी म्हणून निरंजन हिरेमठ, टी. टी. नाडकर्णी, जी. डी. मंकाळे, लक्ष्मण ए., एन. आर. रायकर, रूपाली कांबळे काम पहात आहेत. बुधवार (ता. ८) पासून अर्ज भरण्याची प्रवेश प्रक्रिया चालू होती. तिन्ही गटांकडून अखेरच्या दिवशी या निवडणुकीसाठी भाजप, अपक्ष मिळून एकूण १०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.यामध्ये युवा नेते उत्तम पाटील गटाने अपक्ष ३७, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले गटाकडून अपक्ष ३८ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केले. तर भा. ज. प. कडून एकूण ३० कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. १०६ अर्जांपैकी १४ अर्ज अवैध झाले असून ९२ अर्ज वैध ठरले आहेत.
छाननीनंतर आता अर्जमाघारीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा