दत्तवाडचे फिल्टर हाऊस बनले तळीरामांचा अड्डा
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड (तालुका शिरोळ) येथे गेल्या दहा ते बारा वर्षाच्या मागे सुमारे ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पेयजल योजनेचा फिल्टर हाऊस तळीरामांचा अड्डा बनलेला असून याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असून या परिसरात मद्यपींचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे.
नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून याठिकाणी पेयजल बांधले. या पेयजल योजनेच्या माध्यमातून दत्तवाड वासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार होते. परंतु या पेयजल योजना पूर्ण झाल्यानंतर फक्त काही दिवसच गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तसेच अकार्यक्षम कारभाऱ्यांच्यामुळे ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही पेयजल योजना दहा ते बारा वर्षा पासून बंद स्थितीत आहे. याचा फायदा येथील तळीरामांनी घेतला आहे. या पेयजल योजनेच्या फिल्टर हाऊस च्या वरच्या मजल्यावर दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, सिगारेट पाकीट खाद्यपदार्थाच्या पिशव्या इत्यादी अनेक मोठ्या प्रमाणात साचलेला असून दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. तरी या तळीरामांचा बंदोबस्त करून ही पेयजल योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा