शिरोळ : ऊस अंगावर पडून बैल गंभीर जखमी


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ येथील नदीवेस सोंडमळी विभागात क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने बैलगाडीतील ऊस बैलाच्या अंगावर घसरून पडल्याने बैल गंभीर जखमी झाला आहे. मुका मार बसून चाचीत पडलेल्या बैलाला ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कारखाना शेती विभागाच्या मदतनिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. कामाचा बैल ऐन सिझनमध्ये जखमी, उपचाराचा खर्च आणि काम बंद झाल्यामुळे ऊसतोडणी कामगार कुटुंबावर दुःखाची कु-हाड कोसळली आहे. त्यामुळे कारखान्याने ऊसतोडणी मजुरास भक्कम मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जादा बैलगाड्या भरल्या जातात. बैलांना ओझे पेलवत नाही, कारखान्यांनी बैलगाड्या बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरची व्यवस्था करावी, या मागणीसाठी अंकुश शेतकरी संघटनेने येथील छत्रपती शिवाजी तख्तमध्ये बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. अशातच गाडीतील ऊस अंगावर पडून बैल जखमी झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष