कुमार अन्वेकर यांना ग्रीन वर्ल्ड उद्योगरत्न पुरस्कार
पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :
यशस्वी उद्योजक हे तरूणांसाठी नेहमीच प्रेरणादायी असतात. सर्वसामान्य कुटुंबातून येवून शुन्यातून विश्व निर्माण करणार्या उद्योजकांच्या कथा या तरूणांना नेहमी प्रेरणादायी वाटतात. यासाठी असं साहित्य तरूणांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने ग्रीन वर्ल्ड प्रकाशन गेली 20 वर्षे उत्कृष्ट काम करणार्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करत असतं. यावर्षी मोत्यांच्या दागिन्यांचे व्यापारी व दैवज्ञ ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष उद्योजक कुमार अन्वेकर यांना ग्रीन वर्ल्ड उद्योगरत्न पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. मार्शल(नि.) भूषण गोखले, प्रमुख अतिथी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व कृष्णकुमार गोयल तर ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
कुमार अन्वेकर यांनी कारवार येथून पुण्यात येवून पत्नी कोमल यांच्या साथीने मोत्याचे दागिने बनवण्यास सुरूवात केली. व्यवसाय वाढू लागला. घरातून सुरू केलेला व्यवसाय हळूहळू दुकानात तर काही दिवसातच स्वतःच्या भव्य शोरूममध्ये आला. ‘श्री साई मोतीवाले’ ही पेढी पुण्याचं वैभव वाढविणारी संस्था बनली. व्यवसायाच्या कक्षा रूंदावत त्यांनी आपला व्यवसाय सोलापुर, कोल्हापुर, नागपुर, जळगाव ते थेट रत्नागिरीपर्यंत पोहोचवला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा