आई-वडिलांच्या सेवेतच खरा देव : हभप ज्ञानेश्वर माने महाराज यांचे विचार

 मिरज ते आदमापूर पायी दिंडीचे हेरवाडमध्ये उत्साहात स्वागत


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

आई वडीलांपेक्षा आयुष्यात मोठे काहीच नाही. आई वडील हेच आपला आदर्श असतात. प्रत्येक जण शाळेत नंतर शिकतो. तर पहिले गुरू आई वडील असतात. ते चालते बोलते विद्यापीठ आहे. म्हणून दररोज आई वडिलांचे दर्शन घ्या. त्यांच्या सेवेतच खरा देव आहे, असे प्रतिपादन तरूण किर्तनकार हभप ज्ञानेश्वर माने यांनी केले

हेरवाड येथे आलेल्या मिरज शहर धनगर समाज यांच्या वतीने श्री बिरोबा मंदिर मिरज ते श्री क्षेत्र बाळूमामा मंदिर आदमापूर पायी दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

 यावेळी ते पुढे म्हणाले, आयुष्यात कितीही कष्ट होत असले तरी आई वडलांना वृद्धाश्रमात सोडू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. मातृदेवोभव । पितृदेवो भव, अशी हिंदु संस्कृतीची शिकवण आहे. `आई-वडील व गुरु यांची सेवा करणे, ही सर्वांत उत्तम तपश्चर्या आहे, असे `धर्मग्रंथ सांगतात. पुंडलिकाच्या तपश्चर्येमुळे विठोबा त्याच्यावर प्रसन्न झाला होता. पुंडलिकाचा आदर्श समोर ठेवून आपणही आई-वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन भावाने सेवा-शुश्रुषा करणे, हे आपले कर्तव्यच आहे. आई-वडील संतुष्ट झाल्यास परमेश्‍वरही प्रसन्न होतो. यासाठी आई-वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका. त्यांच्या कामात त्यांना मदत करा. त्यांना देवासमान मानून त्यांची सेवा करा, असे प्रतिपादन त्यांनी केले. आयुष्यात कितीही मोठे झाला तरी आई-वडिलांपासून वेगळे होऊ नका. त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका, असेही ज्ञानेश्वर माने महाराज यांनी सांगितले. यावेळी पायी दिंडीतील महाराज, गावातील वारकरी मंडळी व भाविक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष