जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आघाडीत बिघाडी ; शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने शिवसेनेने स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली.
सत्तारुढ आघाडीतून अखेर शिवसेना बाहेर पडल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दुपारी शिवसेनेचे पॅनेल देखील जाहीर केले. शिवसेनेने तीन जागाची मागणी केली होती. मात्र सत्तारुढ आघाडीने शिवसेनेची ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे अखेर या आघाडीत बिघाडी झाली.
दरम्यान, निवडणुकी आधीच मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा