निपाणी नगरपालिकेचे कर्मचारी राजु मातीवर अपघातात ठार

 

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

         मिरज येथील नातेवाईकांना भेटून येत असता चिंचणी जवळ झालेल्या अपघातात निपाणी नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी राजू दगडू मातीवड्डर अपघातात ठार तर त्यांचे मित्र महेश मातीवड्डर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ओव्हरटेक करताना दुचाकीची मोटारीला धडक बसली. त्यात निपाणी पालिकेचा पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी ठार तर पाठीमागे बसलेला एकजण जखमी झाला. राजू दगडू मातीवड्डर (वय ४८, रा. शिवाजीनगर दुसरी गल्ली, निपाणी) असे मृत आणि महेश रामू मातीवड्डर (वय २०) असे जखमीचे नाव आहे. चिक्कोडी-चिंचणी मार्गावर शुक्रवारी (ता. १७) रोजी दुपारी चारच्या सुमारास अपघात झाला. चिक्कोडी रहदारी पोलिस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. राजू व महेश मातीवड्डर हे दोघे मिरज येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. ते भेटून परत येत असताना चिक्कोडी-चिंचणी मार्गावर निपाणीकडे येत असताना हा अपघात झाला.

सदर अपघातानंतर जखमींना निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र राजू मातीवड्डर गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. राजू मातीवडर हे निपाणी नगरपालिकेत पाणीपुरवठ्याचे काम करत होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष