सैनिक टाकळी येथील चोरी प्रकरणी राज्य गृहमंत्र्यांचे स्वतंत्र तपासणी आदेश

 सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क :


गेल्या आठवड्यामध्ये सैनिक टाकळी येथील दोन म्हशी चोरीला गेल्याने चोऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता .वारंवार घडणाऱ्या या घटनेने सैनिक टाकळी व परीसरातील शेतकऱ्यांच्या जीव मेटाकुटीला आल्याने येथील ग्रामपंचायती द्वारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देण्यात आले होते . याची दखल घेत मंत्री पाटील यांनी डी एस पी ऑफीस ला स्वतंत्र तपासणीचे आदेश दिले होते. या पथकाने घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचे काम केले असल्याचे समजते. लवकरच चोरी प्रकरणाचा छडा लागेल अशी आशा येथील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून केबल चोरी व जनावरे चोरीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत.अगोदरच दोन वर्षे पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. यातून सावरत असताना अवकाळी पावसाने देखील नुकसानीत भर पाडली आहे. कोरोना सारख्या महामारीत शेती व्यवसाय टिकून ठेवणे आव्हान होते. या सर्वांना तोंड देत आपला संसार गाडा पुढे ढकलत असताना या चोरी सारख्या घटनांनी शेतकरीवर्ग पुरा हतबल झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष