बोरगाव नगरपंचायतीसाठी शक्ती प्रदर्शनाने तिन्ही गटाकडून १०५ उमेदवारी अर्ज दाखल
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शेवटच्या दिवशी तिन्ही गटाकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाने एकूण 105 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी निरंजन हिरेमठ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे कडे सुपूर्त करण्यात आले आहेत.
गेल्या 08 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रवेश प्रक्रिया चालू असताना देखील आज तिन्ही ही गटाकडून बुधवार 15 रोजी अखेरच्या दिवशी या निवडणुकीसाठी भाजप अपक्ष मिळून एकूण 105 उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत.
यामध्ये युवा नेते उत्तम पाटील गटाने अपक्ष म्हणत 37 उमेदवारी अर्ज,माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हवले गट यांच्याकडून अपक्ष म्हणून 38 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे.तर आमदार खासदार प्रेमी गटाकडून एकूण 30 कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
युवा नेते उत्तम पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शनाने नगरपंचायत कार्यालयासमोर येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांनीही कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित शक्तिप्रदर्शनाने या ठिकाणी आपल्या उमेदवारांचे अर्ज भरला आहे.शिवाय भाजप पक्षाकडूनही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत याठिकाणी पदयात्रा काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सध्या एकूण 105 उमेदवारी अर्जा पैकी उमेदवार 42 उमेदवार महिला व 63 पुरुष उमेदवारी अर्ज भरण्यात आलेली आहे.
बोरगाव नगर पंचायतीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून निरंजन हिरेमठ, टी टी नाडकर्णी, जी डी मंकाळे, लक्ष्मण ए को,एन आर रायकर,यांच्या शिवाय रूपल कांबळे म्हणून काम पाहात आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा