विकासकामामुळे बोरगाव येथे नगर विकास पॅनेलचा विजय निश्चित : उत्तम पाटील
बोरगाव नगर विकास पॅनलचा प्रचार प्रारंभ
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या पाच वर्षांत सहकाररत्न रावसाहेब पाटील व युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण बोरगाव शहराचा सर्वागीण विकास केला आहे. शहराच्या विकासासाठी राजकारण , जात, पात न करता सर्व पक्षांकडून निधी आणला आहे. त्यामुळेच बोरगाव शहरही विकास कामात जिल्ह्यात अग्रेसर आहे. आपण यापुढेही शहराचा सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याबरोबरच मूलभूत सुविधाही पुरवण्यासाठी कटिबद्ध, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे नगर विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. पॅनल प्रमुख म्हणून उत्तम पाटील यांनी यावेळी मतदारांना मार्गदर्शन केले.
शहराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिराच्या चरणी बॅलेट पेपर ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर ग्रामदैवत बावाढंगवाली , श्री ज्योतिबा मंदिर, महादेव मंदिर , मातंगी मंदिर,यल्लमा मंदिर, बिरदेव मंदिर ,वाशीखांन मंदिर येथे जाऊन पेपर ठेवून शुभारंभ करण्यात आला. प्रचार शुभारंभप्रसंगी डॉ. शंकर माळी , बी. के. महाजन, मायापा कांबळे, बाबासो वठारे, बाबासाहेब पाटील, रमेश कुरळे, सुरेखा घाळे, भारती वसवाडे, सुवर्णा सोबाने, वर्षा मनोगुत्ते, जावेद मकानदार, पिंटू कांबळे, प्रदीप माळी, रोहित माने, संगीता शिंगे , दिगंबर कांबळे, अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, अश्विनी पवार, माणिक कुंभार, गिरिजा वठारे, शोभा हवले, रुकसाना अपराज यांच्यासह नगर विकास पॅनलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बोरगांवचा कायापालट
बोरगाव शहराला स्वच्छ व सुंदर बनवली आहे. गेल्या निवडणुकीत जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासना प्रमाणे सर्व कामांची पूर्तता झालेली आहे. प्रत्येक प्रभागात जातीने लक्ष देऊन त्या ठिकाणी नागरिकांची समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले आहे . आरोग्य , शिक्षण, धार्मिक व सामाजिक क्षेत्राला प्राधान्य देताना सर्व घटकांना विश्वासात घेऊन काम केल्याने शहराचा कायापालट झाला आहे. कोरोना , महापूर, अतिवृष्टी सारख्या संकटसमयी शासना अगोदर आपल्या पॅनल कडून सर्वांना मदत केली आहे. केवळ आश्वासन न देता त्या आश्वासनाची पूर्तता करून दाखविली आहे. मतदारांनी आपल्या वर ठेवलेला विश्वास यापुढे ठेवून आपल्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मताधिक्याने विजयी करण्यास सहकार्य करावे , असेही शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा