कोल्हापूरात १० वर्षीय मुलाला ओमायक्रॉनची लागण ?


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेल्या १० वर्षीय मुलाला ओमायक्रॉनची (Omicron Virus) लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित मुलाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. ओमायक्रॉनची धास्ती पाहता शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोल्हापूर मनपा प्रशासनाने तातडीने संबंधित मुलाचे नमुने पुण्याला तपासण्यासाठी पाठवले आहेत. मात्र, या प्रकाराने मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

संबंधित मुलगा आपल्या कुटुंबियांसमवेत ऑस्ट्रेलियाला गेला होता. हे संबंधित कुटुंब रमणमळा परिसरातील असून, काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीय कोल्हापुरात परतले. तत्पूर्वी, विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात संबंधित कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आला. परदेशातून कोल्हापुरात आल्याने ११ डिसेंबरला त्या कुटुंबाची RT-PCR तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत त्या कुटुंबातील दहा वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.

ओमायक्रॉनची (Omicron) रुग्णसंख्या वाढत असलेल्या जोखीमग्रस्त देशांपैकी सहा देशांतील ३० नागरिक आतापर्यंत कोल्हापुरात दाखल झाले आहेत. या सर्वांची कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) करण्यात आली असून, सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष