अक्कोळजवळील अपघातात निपाणीची युवती ठार

 


निपाणी/ शिवार न्यूज नेटवर्क : 

अककोळ (ता. निपाणी) येथील दुचाकी टँकर अपघातात युवती ठार, तर मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना मंगळवारी ता.21 सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. सुप्रिया उमाकांत कांबळे (वय 20 रा. हुडको कॉलनी ,निपाणी) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.

         शिक्षक उमाकांत कांबळे सायंकाळी मुलगी सुप्रिया दुचाकीवरून निपाणी (केए-23-इस-0177) हुन ममदपूरकडे जात होते. अककोळ ला संगोळी रायन्ना शाळेजवळील पेट्रोल पंपाजनिक पाठीमागून येणाऱ्या टँकरची (केए-22-इएस-0929)ओव्हर टेक करताना दुचाकीला धडक बसली. त्यात सुप्रिया व उमाकांत मोटारसायकलवरून खाली कोसळले. घटनेत सुप्रियाच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. उमाकांत यांना किरकोळ दुखापत झाली. सुप्रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात हलविला. यावेळी पोलिसांनी टँकरचालक बसनगौडा नायकर याला ताब्यात घेतले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष