दानोळीमध्ये शर्यत परवानगीचे स्वागत
 दानोळी/ शिवार न्यूज नेटवर्क :
 दानोळी (ता.शिरोळ) येथे शासनाने दिलेल्या बैलगाडी शर्यतीच्या परवानगीचे स्वागत करत. शर्यत प्रेमींनी फटाक्यांच्या आतेषबाजिसह बैलजोड्याची वाजवत मिरवणूक काढून आनंदत्सव साजरा केला.
गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.यावेळी गावातील शर्यत प्रेमींनी  बैलजोड्यांची वाजत मिरवणूक काढण्यात आली.नागरीकांना साखर वाटप करुन आनंदत्सव साजरा करण्यात आला.
 यावेळी सर्जेराव शिंदे यांनी राज्या शासनाचे व सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन आभार मानले.
पुढे शिंदे म्हणाले
शर्यतीसाठी शासनाने घातलेल्या अटींची  शिथिलता मिळावी.आपल्या कडे एक हजार मिटर शर्यत होतं नासल्यामुळे ही अट शिथिल व्हावी. खिलार जातीचा पळाव बैल तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या    होणाऱ्या कष्टाला उभारी मिळाली आहे.
यावेळी राजदीप थोरात,निलेश खोत,बंडु खिलारे,अशोक दळवी,अल्लु मुजावर,धना भिसे, अमोल काटकर,राजाराम माने,सोमा माने, सुनिल घुलांडे यांच्या सह युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा