पोलिस बळाचा वापर केला तरीही आंदोलन सुरुच राहिल : धनाजी चुडमूंगे
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
ऊस वाहतूक रोखल्या प्रकरणी पोलिसांनी बळाच्या वापर करत आंदोलन अंकुशचा कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आंदोलन मोडून काढले यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी साखर कारखानाचा निषेध व्यक्त करत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने शेतातील ऊस बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी पाच हजार खर्च येत आहे.त्यामुळे गेली दोन वर्षे महापूराने शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसाई भरपाई देखील तोडकी मिळाली आहे तेंव्हा साखर कारखान्याने ऊस बाहेर काढण्यासाठी व्यवस्था करावी या मागणीसाठी मागील आठवड्यात कारखाना व्यवस्थापनास निवेदन देण्यात आले होते मात्र त्यांचा मागणी दुर्लक्ष केल्याने गुरुवार दि.१६ रोजी सकाळी शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दत्त साखर कारखानाची ऊस वाहतुक रोखली यावेळी साखर कारखाना समर्थक व आंदोलक यांच्यात शाब्दिक वादावादी सुरू असताना पोलिसांनी आंदोलन अंकुशचा धनाजी चुडमुंगे,कृष्णा गावडे,भूषण गंगावने,पोपट संकपाळ, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.यानंतर दत्त कारखाना समर्थक ऊसाने भरलेल्या बैलगाड्या ट्रॅक्टर कारखान्याकडे रवाना केल्या.दरम्यान शहरात वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलीस ठाण्यात आल्यानंतर आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी प्रशासनाने गावगुंडांचा वापर करून आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत अटक केली आहे या घटनेचा निषेध करीत असून हे आंदोलन असेच पुढे सुरू राहणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा