अर्जुनवाड येथे विजेचा विद्युत पोल धोकादायक स्थितीत
राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
अर्जुनवाड ता.शिरोळ येथील खोत गल्लीतील सिद्धेवर मंदिरा समोर असणारा विजेचा विद्युत पोल धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे कधी ही नागरी वस्ती वर कोसळून जीवित हानी होऊ शकते
अखेरची घटका मोजणारा हा पोल कधीही कोसळू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हा पोल गावातील भरवस्तीत आहे. त्यामुळे जवळच्याच घरावर पडल्यास घरांचे नुकसानीसोबत जिवीतहानी होऊ शकते. पोल बदलण्याच्या मागणीसाठी अर्जुनवाड मधील नागरिक करीत आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा