बोरगाव येथे जिनलक्ष्मी सौहार्द संस्थेचा दि 12 रोजी शुभारंभ



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

     बोरगाव येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या श्री जिन लक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेचा बुधवार 12 रोजी सकाळी 11.30 वाजता शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख सागर मिरजे यांनी दिली.

      श्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी व श्रद्धानंद महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा), माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले,युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह सुनील नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

        शहरातील ठेवीदारांच्या ठेविला एक विश्वसनिय संस्था लाभावी,त्याचबरोबर शेतकरी, नागरिक,व्यावसायिक सभासदाना आर्थिक उन्नतीसाठी वेळेत आर्थिक सहकार्य करता यावे यासाठी युवा मित्रांच्या कल्पनेतून या ठिकाणी या संस्थेची उभारणी करण्यात येत आहे.

      आज आधुनिकीकृत अनेक सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आलेली असतानाही केवळ जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून अल्पावधीत दीर्घ मुदतीची कर्जे देण्याबरोबरच गरजवंतांना आर्थिक सहायता करण्याच्या उद्देशाने जिनलक्ष्मी सौहार्द नामक सहकारी संस्थेची स्थापना केली जात आहे.त्यामुळे भविष्यात नक्कीच जनतेला या सहकारी संस्थेचा फायदा आणि उपयोग होणार असल्याचे दिसत आहे.

        यावेळी संस्थेचे संस्थापक सागर मिर्जे, चेअरमन अजित पाटील,सचिव ओंकार म्हैशाळे,निलेश पाटील, श्रीमंधर पाटील,भरतेश लगारे,प्रवीण हवले,आनंद मोकाशी,रणजित ऐतवाडे,पोपट चौगुले,प्रकाश फिरगन्नवर,सतिश मोरे, अश्विनी नरवाडे,श्रीदेवी तेरदाळे,अमर सातपुते,रवींद्र वसवाडे,यांच्यासह संस्थेचे सल्लागार,अन्य मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष