1996 बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन सोहळा उत्साहात
राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
शिक्षण आणि नोकरी निमित्ताने बालपणी मित्रापासून कोसो दूर राहणाऱ्या मित्रांना एकत्र जिव्हाळ्याचे स्नेह संमेलन म्हणून बॅच 1996 च्या इयत्ता पहिली च्या विद्यार्थी - विद्यार्थीनी यांचा अर्जुनवाड ता. शिरोळ येथील विद्या मंदिर मराठी शाळेत स्नेह संमेलन सोहळा पार पडला . मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता या जिवाभावाच्या सोहळ्यात खंड पडू नये म्हणून कोरोना चे सर्व नियम काटेकोर पणे पार पाडण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रस्तावाना प्रवीण घाटगे तर सूत्रसंचालन दिग्विजय ढवळे यांनी केले. उपस्थित शिक्षक हलवाई सर, बी. पी. पाटील सर, हिम्मत पाटील सर, भूपाल चौगुले सर यांची पाहुणे म्हणून उपस्थित होते.उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले त्यानंतर दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थी यांना आदरांजली देण्यात आली सर्व विद्यार्थी -विद्यार्थीनी यांनी आपले मनोगत आणि आपले व्यवसाय, नोकरी आदी ठिकाणी काम करीत असल्याचे संगितले जुन्या आठवणी ना उजाळा प्रत्येक जण आवर्जून करीत होता. फॅनी गेम ही घेण्यात आले. त्यानंतर विद्या मंदिर मराठी शाळेच्या माजी शिक्षिका मेहेंद मॅडम यांच्याशी व्हिडीओ कॉल मार्फत संपर्क करून त्यांच्याशी मनमोकळा संवाद झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा