दानोळी मतदार संघ भाजपा स्वबळावर लढण्याच्या तयारीत


 दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :

दानोळी मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक व जिल्हा अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कमळ या चिन्हावर लढण्यासाठी रोहित तवंदकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

शिरोळ तालुक्यातील दानोळी मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टी कडून कमळ या चिन्हावर स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

महाडिक समर्थक म्हणून ओळख असनारे तवंदकर यांचा जनसंपर्क या मतदारसंघात मोठा आहे. आतापर्यंत केलेल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, गरजूंना शासनाच्या योजना पोहचवण्यासाठी केलेली मदत या कामाची पोचपावती म्हणून तवंदकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून सर्व सामान्य नागरिकां मधुन चर्चा होत आहे.

जिल्हा परिषदेच्या उमेदवारीबद्दल दानोळी,कोथळी,कवठेसार, निमशीरगांव,तमदलगे,कोंडीग्रे, जैनापूर या गावातून उत्सुकता लागली आहे.

यावेळी दानोळी जिल्हा परिषद सह शिरोळ तालुक्यातील इतर मतदारसंघांमध्ये ही भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर निवडणुका लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दर्शविली आहे.

दरम्यान भारतीय जनता पार्टी या वेळी कमळ या चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूका स्वबळावर लढवण्यासाठी तालुक्याचे पक्ष प्रमुख नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष