सहकारी संघामुळेच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास : प.पू.स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक स्वामींचे मत
बोरगाव येथे श्री जीनलक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेचे थाटात उद्घाटन
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
शासकीय स्तरावर शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येते पण अंमलबजावणी वेळेवर होत नाही. शेतकऱ्यांचे अडीअडचणी लक्षात घेऊन गरजवंतांना वेळेत पत मंजूर करून शेतकऱ्यांचा जीवन उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रामीण भागातील सहकारी संस्था व संघ करीत आहेत. गाव, समाज व शेतकऱ्यांचे ऋण फेडण्यासाठी येथील युवकांनी एकत्रित येऊन श्री जीनलक्ष्मी संस्थेची स्थापना केली आहे .या संस्थेकडून भविष्यात सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्याला ही प्राधान्य मिळून सहकार क्षेत्राला एक आदर्श संस्था व्हावी अशी सदिच्छा शिवमोगा जिल्ह्यातील नरसिंह राजपुर जैन मठाचे परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथे श्री जीनलक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेचे उद्घाटन परम पूज्य स्वस्ति श्री लक्ष्मीसेन स्वामीजी, डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. तर फोटो पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
युवा नेते उत्तम पाटील यांनी, आज.संस्थेच्या ठेवींमध्ये विक्रमी वाढ होत आहे पण कर्ज वाटप होत नसल्याने संस्था संचालकांना संस्था चालवणे सभासदांना लाभांश देणे हे अवघड बनले आहे. संस्था चालकांनी संस्थेमध्ये राजकारण न आणता राजकारण विरहित संस्था चालावावी तरच सहकार क्षेत्राला प्राधान्य मिळत असते. आज अरिहंत संस्थेचे सर्व क्षेत्रातील कामकाज हे आदर्श ठरत आहे .सभासदांचे विश्वासाला पात्र राहिल्याने आज अरिहंत संस्था म्हणजे विश्वासहर्तता ,सौहार्दता,प्रामाणिकता, पारदर्शकतेला प्रतीक बनले आहे. संस्थाचालकांनी सभासद साठी विविध योजना राबवून वेळेत कर्ज देऊन सभासदांचे हित जोपासावे अशी भावना यावेळी उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ.श्रद्धानंद स्वामीजींनी, सहकारी संस्था आहे ग्रामीण भागातील अर्थकारणाचे कणा आहे. त्यामुळे या संस्था टिकणे गरजेचे आहेत. ग्रामीण भागाचा आर्थिक विकास सहकारी संस्था मुळेच होत असते .त्यामुळे सभासदांनी संस्थेवर विश्वास ठेवून संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. युवा वर्गाने एकत्र येऊन सुरू केलेल्या या संस्थेचे उदघाटनाचे औचित्य दिवशी सुमारे 02,कोटी 11लाखाहुन अधिक ठेवी झाल्याचे यावेळी संस्थेचे चेअरमन अजित पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी जि. प. सदस्य अण्णासाहेब हावले, जय किसान संस्थेचे चेअरमन सुनील पाटील, संस्थेचे मुख्य प्रवर्तक सागर मिरजे, चेअरमन अजित पाटील, डाॅ.शंकर माळी,बी.जे.पाटील, टी.डी.सावाडे,राजू नरवाडे, महावीर मगदुम,संचालक निलेश पाटील, प्रवीण हवले,श्रिमंधर पाटिल, भरतेश लगारे ,आनंद मोकाशी ,रंजीत ऐतवाडे,पोपट चौगुले,प्रकाश फिरगन्नवर, सतीश मोरे ,सौ अश्विनी नरवाडे, सौ श्रीदेवी तेरदाळे, अमर सातपुते, रविंद्र वसवाडे सह सल्लागार मंडळ, नूतन सर्व नगरसेवक,कर्मचारी, सभासद व ग्रामस्थ उपस्थितीत होते. सुत्रसंचालन सुधाकर इंडी,तर स्वागत व प्रास्ताविक चेअरमन अजित भुजगोंड पाटील यांनी केले आभार सेक्रेटरी ओंकार म्हैसाळे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा