फिनिक्सकडून कुरुंदवाडमध्ये कोरोना जनजागृती मोहिम
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील फिनिक्स कॉम्प्युटरच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून शहरातील शासकीय कार्यालये, बँका, आरोग्य केंद्र आणि पोलिस ठाणेमध्ये तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा म्हणून जनजागृतीचे स्लोगनचे पोस्टर बनवून शहरातील चौका - चौकात लावून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
कुरुंदवाड येथील फिनिक्स कॉम्प्युटरच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाते. याचाच एक भाग म्हणून मकर संक्रांतीचे औचित्य साधून शहरातील विविध ठिकाणी तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेवून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आले.
यावेळी फिनिक्स कॉम्प्युटरचे अजय भाट, क्लासच्या सीनियर काजल कांबळे, दीप्ती जुगळे व सर्व स्टाफ उपस्थित होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा