वाय.डी.माने नर्सिंग कॉलेज येथे संविधान साक्षरता अभियान कार्यक्रम संपन्न

 


राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

         सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने संविधान साक्षरता अभियान 26 नोव्हेंबर 2021 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये संविधान साक्षरता अभियान आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने कागल तालुका बार्टी च्या वतीने वाय डी माने नर्सिंग कॉलेज कागल या ठिकाणी प्रमुख वक्ते वैशाली नाईक यांनी महिलांनी लग्नाच्या अगोदर येणाऱ्या समस्या व लग्नानंतरच्या समस्या याविषयी विषय आपले मत वेकत केले.तसेच मुलींनी आपल्या जीवनशैलीमध्ये जगत असताना कोण कोणते बदल केले पाहिजेत. त्यामध्ये राहणीमान. प्रत्येक गोष्टीचा विचार करून योग्य तो निर्णय मुलींनी आपल्या व यामध्ये घ्यावा असे त्यांनी सांगितले

तसेच संरक्षण अधिकारी मा.पिंगळे यांनी महिलांना व मुलींना लग्नानंतर महिला व बालविकास विभागामार्फत मिळणाऱ्या सुविधा यांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समता दुत किरण चौगुले यांनी संविधान साक्षरता अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली तसेच बार्टीच्या विविध उपक्रम याची ही माहिती यावेळी दिली.

या कार्यक्रमासाठी नर्सिंग कॉलेज प्राचार्य सरिता पाटील. सुरेखा तळेकर, नैना कांबळे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

  या कार्यक्रमाचे आयोजन बार्टी चे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये कोल्हापूर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त मा. विशाल लोंढे.योजना प्रमुख उमेश सोनवणे जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष