कोल्ह्याच्या हल्ल्यात १६ बकरी ठार तेरवाड येथील घटना ; लाखो रुपयांचे नुकसान
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील सदाशिव माळी यांच्या मळ्यात बसविण्यात आलेल्या बकऱ्यांच्या कळपावर कोल्ह्यांनी हल्ला करून १५ ते १६ बकऱ्याची पिल्ले ठार करून त्यातील ७ बकरी पळवून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून या हल्यामुळे मेंढपाळ वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक महिती अशी की, तेरवाड येथील सदाशिव माळी यांच्या मळ्यामध्ये हेरवाड येथील शाम आरगे, बंडू देबाजे, दत्ता वाघे यांच्या बकऱ्यांचे कळप शेतात बसविण्यात आले होते. मेंढपाळ शेतात बकऱ्याची पिल्ले बंदिस्त करून बकरी चरविण्याकरीता गेले होते, कोल्ह्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेवून कळपातील १६ बकऱ्यांच्या पिल्लावर कोल्यांनी जबर हल्ला केला. यावेळी गोंधळ उडाल्यानंतर त्यातील सात बकरी घेवून कोल्ह्यांच्या टोळक्याने तेथून पळ काढला. या हल्ल्यात मेंढपाळ वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दानोळी परिसरानंतर आता हेरवाड-तेरवाड परिसरात मेंढ्यांच्या कळपावर बकत्यांनी हल्ला चढविल्यामुळे मेंढपाळ वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. या घटनेची माहिती मिळताच हेरवाड येथील माजी उपसरपंच कृष्णा पुजारी, यशवंत सेना जिल्हाध्यक्ष अमर पुजारी, तालुका उपाध्यक्ष सागर वाघे, शितल पुजारी, महेश अकिवाटे, सागर उगारे, मुकूद अकिवाटे, प्रमोद चौगुले यांनी भेट देवून पाहणी केली व याची माहिती वनविभागाला दिली आहे. वनविभागाच्या वतीने या घटनेचा पंचनामा करण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा