कोल्ह्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या बकऱ्यांचा वनविभागाच्या वतीने पंचनामा

 


तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील सदाशिव माळी यांच्या मळ्यात बसविण्यात आलेल्या बकऱ्यांच्या कळपावर कोल्ह्यांनी हल्ला करून १५ ते १६ बकऱ्यांची पिल्ले ठार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती, या घटनेची माहिती घेवून आज शुक्रवारी सकाळी वनविभागाच्या वतीने या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून या बकऱ्यांवर कोल्हयानेच हल्ला केल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

तेरवाड येथील सदाशिव माळी यांच्या मळ्यामध्ये हेरवाड येथील शाम आरगे, बंडू देबाजे, दत्ता वाघे यांच्या बकऱ्यांचे कळप शेतात बसविण्यात आले होते. मेंढपाळ शेतात बकऱ्यांची पिल्ले बंदिस्त करुन बकरी चरविण्याकरीता गेले होते, कोल्ह्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेवून कळपातील बकऱ्याच्या पिल्लांवर जबर हल्ला केला. यानंतर लोकप्रतिनिधी तसेच यशवत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून वनविभागाला याबाबतची माहिती दिली होती. या माहितीनुसार वनविभागाचे वनरक्षक एम.डी नवाळे, वनपाल आर. के. देसा तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला. यावेळी वनविभागाने हा हल्ला कोल्ह्यानेच केला असल्याचा अंदाज वर्तविला.

यावेळी पंचायत समितीच्या मा.सभापती व सदस्य मिनाज जमादार, सरपंच सुरगोंडा पाटील, अजित अकिवाटे, बंडू बरगाले, युनूस जमादार, ग्रामविकास अधिकारी महालिंग अकिवाटे, माजी उपसरपंच कृष्णा पुजारी, यशवंत सेनेचे सागर वाघे यांच्यासह मेंढपाळ उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीच्या सदस्या मिनाज जमादार व सरपंच सुरगोंडा पाटील यांनी मेंढपाळांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष