चिंचवाड येथे लाखो रुपयांच्या केबल चोरी
राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
कृष्णा नदी परिसरात विद्युत मोटरच्या केबलच्या चोरीची घटना चिंचवाड, ता. शिरोळ येथे घडली. सुमारे एक लाख रुपये किमतीची केबलची चोरी झाली आहे. यामध्ये गणपती कदम, शंकर गोधडे, आण्णासो ककडे, बाबासो चौगुले, अमर कदम, विनोद घाटगे, सुहास मोहिते, रमेश सिदनाळे या शेतकऱ्यांचे केबल चोरीस गेले आहे. केबलच्या आतील तांब्याची तार काढून नेण्यात आले आहे. वारंवार होत असलेल्या केबल चोरीच्या घटनेमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. महापुराने आर्थिक आरिष्ट सापडलेल्या शेतकऱ्यांचे चोरट्यांकडून मोठे नुकसान होत असून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे. चोरट्यांनी विद्युत मोटर केबलमधील तांब्याची तार काढून त्याचे कव्हर तिथेच टाकले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा