शेडशाळ येथे आढळला बेवारस मृतदेह


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास जय भारत पाणी पुरवठा जॅकवेलजवळ कृष्णा नदीपात्रात बेवारस पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती कुरुंदवाड पोलिसांना समजताच रविवारी सकाळच्या दरम्यान पोलिस घटनास्थळी धाव घेवून वजीर रेस्क्यू फोर्सचे प्रमुख रऊफ पटेल यांच्या टीमच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याचा पंचनामा केला, यानंतर शवविच्छेदन करुन त्या ठिकाणीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी घटनास्थळी कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सपोनि बालाजी भांगे, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलिस उपनिरीक्षक किशोर खाडे यांच्यासह वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष