अखेर दानोळीतील मगर पकडण्यास वनविभागाला यश
दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :
दानोळी (ता.शिरोळ) येथील मधला कुंभोज रोड वर असलेल्या मगदूम यांच्या घरासमोरील सांडपाण्याच्या नाल्यात असलेल्या मगरिस पकडण्यासाठी रात्री उशिरा यश आले.
गेल्या अनेक दिवसांपासून मगरीचे दर्शन होत होते ही मगर पकडण्यासाठी गेली दोन दिवस वनविभाग व प्राणी मित्रांची धडपड सुरू होती. गुरुवारी सायंकाळपासून वनविभागाने शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते अखेर गुरुवारी मध्यरात्री ही मगर जेरबंद करण्यात आली. गेल्या चार दिवसापासून ही मगर रस्त्यावर येत होती.या परिसरात लहान मुलांची शाळा,मंदिर,नागरी वस्ती यासह मळ्याभागातील नागरिकांची रहदारी आहे त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते ग्रामपंचायतिच्या, वनविभागाच्या व प्राणी मित्रांच्या सहकार्याने रेस्क्यू करण्यात आले होते. सुमारे दहा तास शर्तीचे प्रयत्न करून या मगरीला पकडण्यात यश आले. या रेस्क्यू साठी अनिमल सहारा फाऊंडेशन, वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या मदतीने या मगरिस पकडण्यात आले. बऱ्याच वेळेला मगरीने सापळ्यातून चुकवा देत त्यातून निसटून गेली परंतु अखेरीस तिला जेरबंद करण्यास यश आलेच. ही मगर पकडून तिचे मेडिकल करून तिला रात्रीच धरण क्षेत्रात सोडण्यात आले असल्याची माहिती वनपाल हातकणंगले रॉकी देसा यांनी दिली. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सह ग्रामस्थांनी मगर पकडण्यास मदत केली.
यांनी पकडली मगर
मगर पकडण्यासाठी अनिमल सहारा फाऊंडेशनचे अजित काशीद,अक्षय मगदूम, सर्वदमन कुलकर्णी, गोविंद सरदेसाई, विजय पाटील,मालोजी माने,ऋषिकेश खोलकुंबे,श्रेयस खेमलापुरे,अथर्व चव्हाण,रोहित पाटील,उमेश जाधव राजू चिपरे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा