नेपाळ येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सुषमा शेटेला गोल्ड मेडल

 



इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

          नेपाळ येथे झालेल्या कराटे कमीते प्रकारच्या चॅम्पियनशिपमध्ये इंचलकरंजी येथील एका गरीब घराण्यातील सुषमा शेटे हिने यश संपादन करून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धे मध्ये भारतामधून 5 मुलींची निवड झाली होती यामध्ये तेलंगणा राज्यातील 2 तर महाराष्ट्रातून 3 मुलींची निवड करण्यात आली होती. 

या तीन मुलींमध्ये इंचलकरंजी शहरातून 2 मुलींची निवड झाली होती. नेपाल इंटरनॅशनल हिरोज चॅम्पियनशिप 2021-2022 ऑर्गनाईजड बाय युथ स्पोर्ट डेवलपमेंट फोरम नेपाळ रजिस्टर बाय इंटरनॅशनल युथ स्पोर्ट अँड एज्युकेशन फेडरेशन हेल्ड रंगशाला पोखरा नेपाल यांचे वतीने ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यामध्ये इचलकरंजी येथील सुषमा शेटे हिने गोल्ड मेडल मिळवून यश प्राप्त केले. यासाठी तिला प्रशिक्षक म्हणून असलम पटेल यांचे मार्गदर्शन लाभले असलम पटेल हे कोल्हापूर येथे योगा व फिटनेस क्लासेस चालवितात. सुषमा शेटे हिच्या यशाबद्दल शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष