चिंचवाड पाणीपुरवठा पाईपलाईनला मोठी गळती
राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
चिंचवाड, ता. शिरोळ येथील मळाभाग येथील पाणी पुरवठा पाइपलाईनच्या इयर व्हॉल्वला मोठी गळती झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने मळाभागात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. गेल्या आठ दिवसापासून पाणी वाया जात असून ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे.
चिंचवाड येथे पाणी पुरवठा पाइपलाईनच्या मेन लाईनला ठिकाणी पाण्याची गळती होत असल्याची तक्रार पंधरा दिवसापूर्वी आंदोलन अंकुशचे आप्पासो कदम यांनी केले होते. या तक्रारीनंतर व्हॉल्व दुरुस्त करण्यात आले होते. मात्र दुरुस्त केल्यानंतर दोनच दिवसात पुन्हा हॉल्व नादुरुस्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
गेल्या आठ दिवसापासून वारंवार तक्रार करूनही याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. वाल्व लवकर दुरुस्त करा व मळा भागातील पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुशचे आप्पासो कदम यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा