कुरुंदवाड आगार येथील ए.सटी कर्मचार्यांना भाजयुमो तर्फे जिवनावश्यक वस्तुंचे वाटप

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकातदादा पाटील यांच्या प्रेरणेतुन भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापुर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी गेली ५७ दिवस उपोषणास बसलेल्या २२७ ए.सटी कर्मचार्यांना जिवनावश्यक वस्तु किटचे वाटप केले.

गेली ५७ दिवस ए.सटी कर्मचारी राज्य सरकारने ए.सटी खात्याचे विलगीकरण करावे या मागणीसाठी लढा देत आहेत. या कर्मचार्यांचे उदरनिर्वाह साधन उपोषणा मुळे थांबले आहे या साठी त्यांच्या संसाराला हातभार लावण्या साठी भाजयुमो तर्फे जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

या वेळी शिरोळचे नगरसेवक राजाराम कोळी, इम्रान आत्तार, पंडीत काळे, विजय आरगे, पांडुरंग माने, नेते पोपट पुजारी, विराज यादव, संभाजी भोसले, भाजपा अर्जुनवाड ग्रा.प सदस्य विश्वनाथ कदम, निवृत्त कर्मचारी सतिश आडगुळे, कुटवाड ग्रा.प सदस्य विजय पाटील, नवजीत पाटील, प्रफुल्ल कोळी, विद्यार्थी आघाडी शिरोळ अध्यक्ष प्रतिक पाटील, तालुका उपाध्यक्ष योगराज कोळी, तालुका सरचिटणीस युनुस नदाफ तसेच भाजपा व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष