विकेंड कर्फ्यूला नागरिकांचे सहकार्य आवश्यक

 पाचवा मैल चेकपोस्टला तहसिलदारांची भेट


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्र राज्य बरोबर कर्नाटक राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढत आहे ,त्यामुळे राज्य सरकारने खबरदारी म्हणून विकेंड कर्फ्यू लागू केले आहे. यासाठी सीमाभागातील नागरीक सहकार्य  करणे गरजेचे आहे. तालुका प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. यासाठी सीमाभाग व महाराष्ट्र जवळ असलेल्या बोरगाव येथे दोन चेकपोस्ट उभारण्यात आले असून त्याठिकाणी 24तास अधिकारी कार्यरत आहेत. सर्वांनी सरकारच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे असा इशारा निपाणीचे तहसीलदार मोहन भस्मे यांनी दिला.

आज विकेंड कर्फ्यू च्या पार्श्वभूमीवर बोरगाव जवळील आयको व पाचमैल येथे उभारण्यात आलेल्या चेकपोस्टला त्यांनी भेट देऊन पाहणी केली.

येथे कार्यरत असलेले अधिकारी परराज्यातून येणाऱ्या ची rt-pcr प्रमाणपत्र तपासावे.आर. टी.पी.सी.आर. प्रमाणपत्र असेल तरच त्यांना राज्यात प्रवेश द्यावा अन्यथा नाकारावा. जिल्ह्यात वाढता कोरोणाचा परिस्थिती पाहून आणखी कठोर नियम लागू करायचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत .त्यामुळे तालुक्यात कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. करफ्यू  वेळी विनाकारण फिरणाऱ्या  नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी कुणीही वर्दळ करू नये .सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. विकेंड कर्फ्यू ला तालुक्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून अधिकारी व कर्मचारीही आपले काम करीत आहेत. कोगनोळी बरोबरच बोरगाव चेकपोस्ट वरहिन प्रवाशांची वर्दळ वाढत आहे .यासाठी या ठिकाणी आणखी जास्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शेवटी तहसीलदार मोहन भस्मे यांनी केले.

यावेळी मुख्याधिकारी पी. ए. कल्याणशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र अज्जान्नावर, ग्राम तलाटी मल्लिकार्जुन, विलास माळी, यांच्यासह महसूल, पोलिस ,आरोग्य ,कर्मचारी अंगणवाडी,आशा कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष