ग्रामपंचायतीमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी




हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विशाल जाधव म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा आढावा घेवून त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जोपासण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील, उपसरपंच विकास माळी, ग्रामविकास अधिकारी पी. आर. कोळेकर, आप्पासाहेब जोंधळे, सुकूमार पाटील, अजित अकिवाटे, संजय पुजारी, बंडू बरगाले, संतोष तारळे, विशाल जाधव, शेखर कुन्नुरे, संतोष शिरोळे, सुरज कुन्नुरे, आशपाक नदाफ, अनिल कोरवी, शुभम पुजारी, रेहान नदाफ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, ग्रामपंचायतीमध्ये एकाच ठिकाणी दोनवेळा जयंती साजरी करण्यात आल्याने सत्ताधारी व विरोधकांची धुसफूस यावेळी पहायला मिळाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष