बोरगाव नगरपंचायत नव निर्वाचित नगरसेवकांचा शुभ मुहूर्तावर पंचायत कार्यालयात प्रवेश
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत पंचवार्षिक निवडणुकीत विजयी नगर विकास पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज बुधवार दिनी शुभ मुहूर्तावर नगरपंचायत कार्यालयात प्रथमताच प्रवेश करण्यात आला.दरम्यान नगरपंचायत प्रशासनाकडून सर्व नगरसेवकांचा प्रवेश प्रित्यार्थ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
युवा नेते उत्तम पाटील यांच्या उपस्थित प्रवेश झालेल्या सर्व नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयात प्रतिमेचे दर्शन घेऊन कलश पूजन केले दरम्यान नगरसेवक महिला मंडळींनी पूजाअर्चा करून शुभदिनी नगरपंचायत कार्यालयात प्रवेश केला
जनतेने ठेवलेल्या विश्वासास पात्र राहून येणाऱ्या काळात शहरातील उर्वरित सर्वच कामे पूर्णत्वाला नेऊन आपण शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे युवा नेते उत्तम पाटील यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत नगर विकास पॅनलचे सर्वहि सोळा विजेते नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक अभय मगदूम माणिक कुंभार,प्रदीप माळी,तुळशीदास वसवडे,दिगंबर कांबळे,पिंटू कांबळे,सौ शोभा हवले, सुवर्णा सोबाणे,भारती वसवाडे, वर्षा मनोगुत्ते,जावेद मकानदार,रोहित माने-पाटील,सौ संगीता शिंगे,अश्विनी पवार, गिरिजा वठारे, रुकसाना अफराज,यांच्यासह अन्य मान्यवर हितचिंतक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा