हेरवाड विकास सेवा सोसायटीची होणार निवडणूक ?

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या येथील हेरवाड विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या निवडणूकीसाठी मोठ्या हालचाली सुरु झाल्या असल्याचे समजते, सभासद व गावातील काही नेते या सोसायटीच्या निवडणूकीसाठी स्वतंत्र पॅनेल उभे करणार असल्याची चर्चा हेरवाड गावात सुरु असल्याने सत्ताधारी गटाला निवडणूक लढवावी लागणार ? की निवडणूक बिनविरोध होणार ? याकडे हेरवाड गावचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीतील लाख मोलाच्या मतांमुळे शिरोळ तालुक्यातील सेवा सोसायट्यांच्या निवडणूकीलाही महत्व प्राप्त झाले आहे. शिरोळ तालुक्यातील विविध गावात सेवा सोसायट्यांच्या निवडणूका होत आहेत, तर काही बिनविरोध होत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणूकीनंतर शिरोळ तालुक्यातील सेवा सोसायटीतील सभादांच्याही आशा पल्लवीत होत आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यात निवडणूकीच्या हालचाली गतीमान झालेल्या आहेत. तसेच काही सेवा सोसायटीत सभासदांना विश्वासात न घेता सुरु असलेला कारभार, कमी डिव्हीडंड वाटप, संचालकांचा मनमानी कारभार यामुळे शिरोळ तालुक्यातील बहुतांशी सेवा सोसायट्यांच्या निवडणूका सुरु आहेत.

शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील हेरवाड विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीतील नाराज सभासद व काही मंडळींनी निवडणूका लावण्यासाठी स्वतंत्र पॅनेल उभे करणार असल्याची चर्चा गावात जोरदार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नाराज सभासद व संचालकांची नाराजी दूर करण्यासाठी बैठकाही सुरु असल्याचे नागरीकांतून बोलले जात आहे. त्यामुळे या संस्थेची निवडणूक लागणार? की निवडणूक बिनविरोध होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष