दानोळीत मृत मगरीवर वन विभाग व ग्रामस्थांच्या वतीने अंत्यसंस्कार

 


दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :

            येथील वारणा नदीत रविवारी सकाळी मृत अवस्थेतील मगर आढळून आली. आज दोन तासांच्या शोध मोहिमे नंतर मृत मगर सापडली. पंचनामा करून दफन विधी करण्यात आला.

          सोमवारी सकाळी वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने नदी पात्रात शोध मोहीम सुरू केली. मळी परिसरात मृत मगर दिसून आली. मगरीला पाण्यातून बाहेर कढण्यासाठी ग्रामस्थ इसाक नदाफ, सोहेल नदाफ, इर्शाद नदाफ , पोलीस पाटील प्रशांत नेजकर, ग्रामपंचायत कर्मचारी बंडा यादव, सहारा ऍनिमल फाऊंडेशनचे अक्षय मगदूम, मालोजी माने, सागर पाटील, विजय पाटील यांनी परिश्रम घेतले. 

           यावेळी वनपाल रॉकी देसा, एस.एस शिरोळकर, म. द. नवाळी, मोहन देसाई, लहू भंडारी, भगवान भंडारी, हरी जाधव, दिलीप पाटील. ग्रामसेवक के.आर.बागुल, तलाठी महेश नागरगोजे, कोतवाल अकबर मुल्लानी उपस्थित होते. पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र देशमुख यांनी पंचनामा करून नदी काठावर दफन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष